नांदेपेरा येथील ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश

राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांनी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला. मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राजू उंबरकर यांचे कार्य महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी असलेले पक्षाचे ध्येय यामुळेच मनसेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी भावना पक्ष प्रवेश करणा-यांनी सोहळ्यात व्यक्त केली. राजू उंबरकर यांनी पक्ष प्रवेश करणा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना पक्षाच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सोहळ्यात स्थानिक समस्येवर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या धोरणांद्वारे या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार करण्यात आला. सोहळ्याला मनसेचे वणी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments are closed.