जांबुवतराव धोटेनंतर राजू उंबरकर हा ‘विदर्भवीर’ – प्रकाश महाजन

राज ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभर्थ्यांना बियाणांचा वाटप.. शर्मीलाताई ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना सुरु करण्याची घोषणा

जितेंद्र कोठारी, वणी : जांबुंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू उंबरकर विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे आयोजित राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थ्यांना बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना चणा बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.

विदर्भात कोणत्याही पक्षात राजू उंबरकर सारखा खंबीर नेता नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ मीच फोडणार. असेही मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन यांनी सांगितले. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले की 70 टक्के किंवा जास्त मार्क मिळालेल्या गरीब विद्यार्थ्याला मनसे तर्फे प्रवेश व शिक्षणाचा खर्च तसेच गृह उद्योग करणे इच्छुक महिलांना मनसे तर्फे पुरेपूर मदत केली जाते. मनसे नेते आनंद एम्बडवार यांनी उपस्थित हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, शासनाने जर स्वामीनाथन आयोगाची शिफारश लागू केली तर एकही शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज राहणार नाही व शेतकरी सक्षम होईल.

मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या कार्यक्रमात शर्मीलाताई ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना वणी उपविभागात राबविण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नापासून तिच्या पहिल्या बाळंतपणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनर्माण सेना पूर्ण करतील. अशी घोषणा राजू उंबरकर यांनी केली. प्राचार्य दिलीप अलोणे यांनी उपस्थित हजारो शेतकऱ्यांना चणा लागवड व शेती विषयक सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिलीप बापू धोत्रे यांचे स्वागत महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोधाडकर व महिला कार्यकर्त्यांनी केले. मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन यांचे स्वागत मनसे वणी, मारेगाव व झरी तालुकाध्यक्ष यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. आनंद एम्बडवार यांचे स्वागत वणी, मारेगाव व झरी शहर अध्यक्ष यांनी केले. राजू उंबरकर यांचे स्वागत सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगन्नाथ महाराज दिग्दर्शकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजू निमसटकर यांनी केले. बियाणे वाटप कार्यक्रमात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ता, हजारोच्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या. यावेळी स्नेहाभोजनाचे आयोजनही करण्यात आले.

Comments are closed.