ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक

मनसे रुग्णसेवा केंद्रातून पोलिसांनी घेतले ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी तालुक्यातील 4 पदाधिकाऱ्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण रुग्णालय समोरील मनसे रुग्ण सेवा केंद्रातून पोलिसांनी दुपारी 12 वाजता दरम्यान चौघांना ताब्यात घेतले. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, माजी नगरसेवक धनंजय त्रिम्बके व रोशन शिंदे याना पोलीस वाहनांमध्ये बसवून ठाण्यात नेण्यात आले आहे.

4 मे पासून मशिदीचे समोर भोंगे लावून हनुमान चाळीसा पठन करण्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आदेश तसेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मंगळवारी रात्रीपासून त्यांचे निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

Podar School

पहा व्हिडीओ-

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!