मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

लग्नात गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून केले मोबाईल लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. दरम्यान चोरट्याचे दोन साथीदार संधी साधून फरार होण्यास यशस्वी झाले. सदर घटना शुक्रवार 25 नोव्हे. रोजी वरोरा मार्गावरील एस.बी. लॉन मध्ये घडली. मोबाईल चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. चेतन संजय पारखी (29) रा. रामपुरा वार्ड वणी असा मोबाईल चोरट्याचा नाव आहे.

तक्रारदार अनिरुद्ध वेंकटेश उपलवर (19) रा. अहेरी, जि. गडचिरोली हा आत्याच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मित्रांसह वणी येथे आला होता. रात्री 8.30 वाजता दरम्यान अनिरुद्ध आपले मित्र आशिष पोलपोलवार सोबत एस.बी. लॉन मंगल कार्यालयात प्रवेश करत असताना त्याच्या खिशातून रियलमी कंपनीचा मोबाईल व आशिषच्या मोटोरोला कंपनीचा मोबाईल चोरी गेल्याचे समजले. दोघांनी बाहेर येऊन बघितले असता काही लोक एका युवकास पकडुन मारहाण करीत होते.

दरम्यान तेथील एका जणाने फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्या युवकाला विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव चेतन संजय पारखी असे सांगितले. तसेच मोबाईल चोरी केल्याचे कबूल करून चोरलेले मोबाईल त्याचे इतर दोन साथीदार संतोष मेश्राम व साहिल यांना दिल्याचे पोलिसांना संगितले. त्यांनतर तक्रारदार अनिरुद्ध वेंकटेश उपलवार रा. अहेरी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये रियलमी कंपनीचा मोबाईल किंमत 8 हजार व मोटोरोला कंपनीचा मोबाईल किंमत 6 हजार असे 14 हजाराचे दोन मोबाईल चोरीची तक्रार नोंदविली.

तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी चेतन संजय पारखी तसेच त्याचे फरार साथीदार संतोष मेश्राम रा. रामपूरा वार्ड वणी व साहिल कैलाश पुरी, रा. सेवानगर वणी विरुद्ध कलम 34, 379 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.