मांगली (हिरापूर) येथील मोहरम उत्सव धार्मिक एकात्मतेचे प्रतीक

या १००वर्षांच्या परंपरेला संजय देरकर यांनी लावली हजेरी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथे साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेली आहे. या उत्सवात हिंदू-मुस्लिम समाजाचे बांधव एकात्मतेच्या भावनेने मोहरम उत्सव साजरा करण्याचे ध्येय जोपासतात. परिणामी हा मोहरम उत्सव गेल्या शेकडो वर्षांची परंपरा जोपासत हिंदू-मुस्लिम समाज बांधवांचे एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे. या उत्सवाला संजय देरकर यांनी भेट दिली. उपस्थितांशी संवाद साधला.

मोहरम उत्सव हा दहा दिवसांचा नियोजीत असल्याने बाहेर गावातील येणाऱ्या भावी-भक्तांची जोरदार गर्दी असते. यात ‘सवारी व डोला’ यांची प्रतिकृती बनवून भक्त मंडळी खांद्यावर घेऊन उत्सव करीत असतात. या मोहरम उत्सवात बऱ्याच प्रमाणात ‘नवस’ करण्याचा व फेडण्याची प्रथा रूढ आहेत. यादरम्यान महाराष्टसह, आंध्रप्रदेश आणि तेंलगाना प्रांतातील हजारो भाविक-भक्त येतात.

हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन शेकडो वर्षांपासून रूढ असलेल्या ‘मोहरम’ उत्सवाची परंपरा या गावात आजही पाहावयास मिळते. दोन भाऊ धर्मयुद्धामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पराभव न पत्करता युद्धभूमीत लढत राहिले. यात त्यांना वीरमरण आले. याच घटनेचं स्मरण म्हणून ‘मोहरम’ करण्यात येतो. अशी आख्यायिका असल्याची यावेळी सांगण्यात येते.

मोहरम सणानिमित्त मांगली ,हिरापूर राजूर ,भेंडाळा, लिंगटीसह तालुक्यातील अनेक गावातील लोक सहभागी होतात. घरांची रंगरंगोटी,संपूर्ण घर साफसफाई करून स्वछ केले जाते. विशेष म्हणजे मोहरमच्या दिवशी बाहेर गावी अथवा कुठेही असो त्यादिवशी प्रत्येक व्यक्ती हजर राहतो .

या उत्सवादरम्यान दररोज दुरदूर वरून भावी-भक्तासह ‘सवारी व डोला’ यांची प्रतिकृती बनवून मांगली(हिरापूर) येथे हजेरी लावतात. उत्सवाचा शेवटचा दिवस दहावी म्हणजेच ‘मोहरम’ या दिवशी मांगली (हिरापूर) येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन असते. आजू-बाजूच्या खेडे गावातील मंडळी मोठ्या संख्येने मोहरम उत्सवात सहभागी होतात.

मांगलीतला उत्सव म्हणजे प्रेम आणि एकतेचं प्रतीक – संजय देरकर

मोहरम निमित्त संजय देरकर यांनी मांगलीला भेट दिली. हा सण म्हणजे त्याग, प्रेम आणि एकतेचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक मोहरम आहे. सर्व जाती-धर्मातील लोक प्रेमानं या उत्सवात येतात. सर्व मिळून या उत्सवात आपापल्या परीने योगदान करतात. मांगलीचा मोहरम हा समाचापुढे एक मोठा आदर्श आहे. सवारी व डोलारा खांद्यावर घेऊन फेरीसुद्धा काढली त्यावेळी संतोष कुचनकर,सुनील ढाले, नितीन गोरे, संतोष राखूडे, गजानन गोरे, डॉ नेताजी पारशिवे, अरुण ताजने, हरिदास केळझरकर, शंकर देरकर, दीपक कांबळे व समस्त ग्रामवासी होते.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!