ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जनाला थाटात आरंभ

डीजेला बंदी, पोलीसांचा चोख बंदोबस्त

0 236

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आज वणीत अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. याकरिता पोलीस यंत्रांना सज्ज असल्याची माहिती आहे. गणपतीचे विसर्जन दोन दिवसांत म्हणजे गुरुवारी व शुक्रवारी करण्यात येणार. यामध्ये टिळक चौकापासून ते बसस्थानक परिसर व दुसऱ्या दिवशी टिळक चौकापासून ते दीपक चौपाटी परिसरातील गणेशाचे विसर्जन होणार आहे.

सोमवारी 2 सप्टेंबर सोमवारी रोजी बाप्पाचे आगमन झाले. थाटात आगमन झाल्यानंतर 10 दिवस कसे निघून गेले हे भक्तांना समजलेही नाही. आता बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आला आहे. याबाबत पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वणीत व वणी ग्रामीण मध्ये परवाना प्राप्त 52 गणेश मंडळ आहेत. त्यापैकी गुरुवारी शहरातील 15 व ग्रामीण मधील 17 असे एकूण 32 गणपतीचे विसर्जन होणार आहे. याकरिता 4 पोलीस अधिकारी 40 कर्मचारी व 30 होमगार्ड दिवसरात्र कार्यरत राहणार आहे.

गुरुवारी टिळक चौक ते चिखलगाव बसस्थानक परिसरातील बाप्पाचे विसर्जन होणार आहे. तर शुक्रवारी टिळक चौकापासून ते दीपक चौपाटी या परिसरातील गणपतीचे विसर्जन होणार आहे. डिजेला पूर्णपणे बंदी असून रात्री 10 वाजेपर्यंत बँड वाजविण्याची परवानगी राहणार आहे. सदर सर्व कर्मचारी हे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मागदर्शनात आपल्या कर्तव्यावर राहणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विजय राठोड यांनी दिली.

Comments
Loading...