संपत आली जवानी, तरी सास-याची अधुरी कहाणी

सुनेवर अत्याचार करताना सासरा रंगेहाथ आढळला, गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वय झाले तरी पिकल्या पानाचा देठ हिरवा म्हणत अजूनही यौवनात असल्याचा आव आणत स्वत:च्या सुनेवरच वाईट नजर टाकत तिचे शोषण करणा-या सास-याविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारा प्रकार नुकताच उघडकीस आल्याने रंगेहाथ सापडलेला सासरा फरार झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार वणी येथील मुलीचे लग्न 2016 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावातील तरुणासोबत झाले होते. तीन महिन्याआधी दिवाळीच्या वेळी विवाहित तरुणी ही वणी येथे माहेरी आली होती. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती. 6 जानेवारी रोजी विवाहितेचा सासरा हा सुनेला सासरी घेऊन जाण्यासाठी वणीला सुनेच्या घरी आला होता. शुक्रवारी 7 जानेवारी रोजी युवतीचे वडील कामावर गेले असता सासऱा व सून घरी एकटेच होते. ही संधी साधून सास-याने सुनेला बळजबरीने खोलीत नेले. तिथे तो तिच्यावर अत्याचार करीत होता. मात्र त्याच वेळी मुलीची आई घरी पोहचली व तिनं सर्व दृश्य बघितले.

Podar School

खुद्द स्वत:च्या सुनेवर दुष्कर्म करीत असताना रंगेहात सापडल्याने सासरा घाबरला व तो तात्काळ घरून ‘नऊ दो गॅरह’ झाला. सदर घटनेमुळे मुलीची आई हादरून गेली. संध्याकाळी पीडित विवाहितेचे वडील कामावरून परत आले तेव्हा मुलीच्या आईने सर्व हकीकत त्यांना सांगितली. पीडितेच्या आईने रंगेल सास-याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. रविवार 9 जानेवारी रोजी तिने वणी पोलीस स्टेशनमध्ये नराधम सास-या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 376 (2)(F)(N) व 506 अनव्ये गुन्हा दाखल केला.

आरोपी सासऱ्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रविवारी रात्रीच चंद्रपूर जिल्ह्यात गेले असल्याची माहिती आहे. पुढील तपास पीएसआय प्रवीण हिरे करीत आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!