Job Alert : बजाज फिनसर्व, वणी शाखेत भरती सुरू

रिलेशनशिप मॅनेजर (गोल्ड लोन) पदासाठी भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

बहुगुणी डेस्क, वणी: तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून बजाज फायनान्स लिमिटेडच्या वणी शाखेत रिलेशनशिप मॅनेजर (गोल्ड लोन) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. ही पूर्णवेळ (Full Time) ऑन-रोल नोकरी असून उमेदवाराला सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

कंपनीकडून आकर्षक वेतन, उद्योगातील सर्वोत्तम प्रोत्साहनपर (Incentives) योजना, प्रशिक्षण, करिअर ग्रोथच्या संधी आणि विश्वासार्ह ब्रँडसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी किंवा अर्जासंदर्भात निसार सय्यद (वरिष्ठ शाखा व्यवस्थापक): 📞 9763597086 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच nisar.sayyad@bajajfinserv.in या ई-मेलवरही संपर्क साधता येईल.

पद: रिलेशनशिप मॅनेजर (गोल्ड लोन)
ठिकाण: बजाज फायनान्स लिमिटेड, वणी शाखा
पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
नोकरीचा प्रकार: फुल टाइम, ऑन-रोल

बजाज फिनसर्वचा विश्वास…
बजाज फिनसर्व ही सुप्रसिद्ध बजाज फायनान्स लिमिटेडची शाखा असून गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांचा ‘बजाज’ या नावावर विश्वास आहे. आपल्या परिसरातील लाखो ग्राहक विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बजाज फिनसर्वच्या सेवांचा लाभ घेत आहेत. याच विश्वासाचा भाग म्हणून वणी शाखेत गोल्ड लोन सुविधाही उपलब्ध असून ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा दिली जाते.

पत्ता : बजाज फिनसर्व, जटाशंकर चौक, पांडे मोबाईल शॉप जवळ, वणी 445304

Comments are closed.