विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणातील तीन मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून चोरट्या कडून चार मोटरसायकल जप्त केल्या आहेत. चंदन सदन चौधरी (40) रा. खैरा चकणी जिल्हा बकसार उत्तरप्रदेश, मोहम्मद अनिस मोहम्मद रईस (30) रा. वाठोडा, सूरज बलविर सिंग (19) रा. पारडी नागपूर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
फिर्यादी मनोज तुळशीराम धगडी (37) रा.वेगाव ता. मारेगाव यांच्या मालकीची (MH 34 BA 6966) पॅशन प्रो दुचाकी डोंगरगाव शेत शिवारातुन अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनला दिनांक 4 नोव्हेंबर रोजी तक्रार देण्यात आली होती. त्यावरून वणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत आरोपी चंदन सदन चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी झालेली पॅशन प्रो (MH 34 BA 6966) हिरो होन्डा स्प्लेंडर (MH 29 1223) व बजाज डिस्कवर (MH 29 AF 2201) अशा तीन गाड्या जप्त करण्यात आल्या.
दुसऱ्या घटनेतील फिर्यादी संजय रामभाऊ भगत रा. वणी यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस (MH 29- AH 1876) वाहन आरोग्य विभागाच्या गेट जवळून चोरी गेले होते. या प्रकरणी आरोपी मोहम्मद अनिस मोहमद रईस, सूरज बलविर सिंग यांना पारडी नागपुर वरून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी तीन आरोपींना गजाआड केले असून आरोपीवर कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप. वि.पो.अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि.वैभव जाधव, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.हवा. सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वाडरस्कर यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)