धामणीच्या अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

5 वर्षांच्या बलिकेवर 40 वर्षीय नराधमाने केला होता अत्याचार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे एका 5 वर्षांच्या बलिकेवर 40 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची विशेष दखल घेण्यात आली. पीडितेला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच या अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील द्यावा. पीडितेच्या कुटुंबास आर्थिक मदत घ्यावी. आरोपीला जामीन मिळू नये. प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्वरित न्याय द्यावा. आदी मागण्या महिला आयोगाकडून करण्यात आल्यात.

घरी एकटी असल्याचा फायदा उचलत गावातीलच एका 40 वर्षीय नराधमाने चक्क पाच वर्षांच्या बलिकेवर अतिप्रसंग केला. माणूसकीला काळिमा फासणारी ही धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील धामणी येथे 26 ऑक्टोबरला घडली.

बंडू पांडुरंग भडके असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडितेचे आईवडील कापूस वेचणीच्या कामाला शेतात गेले होते. तर पीडित मुलगी आपल्या सात वर्षीय मोठ्या बहिणीसोबत घरी होती. दरम्यान, मोठी बहीण बाहेर खेळायला गेली. तर पीडित बालिका टिव्ही बघत घरी होती. याचवेळी आरोपी बंडू पांडूरंग भडके (40) याने पीडित बालिका घरात एकटी असल्याचे पाहून प्रवेश केला. बालिकेवर बळजबरीने अतिप्रसंग केला आणि पळून गेला.

संध्याकाळी आईवडील शेतातून कामावरुन परत आलेत. तेव्हा पीडितेने आई वडिलांना आपल्या सोबत घडलेली आपबिती सांगितली. आईवडीलानी तत्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी बंडू भडके यांचे वर कलम 376 AB, भादंवी सहकलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून मारेगाव पोलिसानी काही वेळातच आरोपीला अटक केली होती.

या प्रकरणाबाबत विविध राजकीय पक्षांनी आरोपी नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी निवेदनाद्वारे केली असून भाजप महिला आघाडी च्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चासुद्धा काढण्यात आला होता.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.