राजूर येथील सायडिंग हटण्यापर्यंत आंदोलन चालणार

राजूर बचाव संघर्ष समितीच्या वणीतील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर कॉलरी येथे सुरू झालेल्या रेल्वे कोळसा सायडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर गावात प्रदूषण होत आहे. त्यामुळे गावातील रहिवाशांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होत असून त्यामुळे सायडिंग तात्काळ अन्यत्र हटवावी अशी मागणी गावक-यांतर्फे करण्यात आली आहे. याबाबत राजूर बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून त्याची वणी येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात सायडिंग हटविण्यापर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बैठक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला संजय देरकर, महेंद्र लोढा, राजू उंबरकर, जयसिंग गोहोकार, शंकरराव दानव, राजाभाऊ पाथ्रडकर, विक्रांत चचडा, ऍड. रुपेश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

राजूर येथील कोळशाच्या रेल्वे सायडिंग मुळे उद्भवलेल्या समस्येमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येथील कोळसा सायडिंग गावातील लोकल बॉडी म्हणजेच ग्रामपंचायतीची परवानगी व प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांचे पालन न करता सुरू असल्याने अवैध आहे. परिणामी ग्रामसभा घेऊन कोळसा सायडिंग हटविण्याची प्रस्ताव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा व जो पर्यंत कोळसा सायडिंग गावातून हद्दपार होत नाही तोपर्यंत संघर्ष चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळेस राजूर बचाव संघर्ष समितीचे माजि जप सदस्य संघदीप भगत, डेव्हिड पेरकावार, मो. अस्लम,अशोक वानखेडे, कुमार मोहरमपुरी, डॅनी संड्रॉवार,प्रवीण खानझोडे, बालाजी मिलमिले, अनिल डवरे, साजिद खान,प्रदीप बांदूरकर, रफिक सिद्दीकी, अमृत फुलझेले, जयंत कोयरे, रियाजुल हसन, मो. खुसनुर,फैजल खान, रतन राजगडकर,राहुल कुंभारे, श्रावण पाटील, समय्या कोंकटवार, महाकाली पामुलवार, मंगेश जुनघरी, विजय तोतडे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

Comments are closed.