सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. या तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तूर, सोयाबीन व चना या तारण ठेवलेल्या मालावर ७५ टक्के कर्ज मिळत असून यावर 180 दिवसांकरिता फक्क ६ टक्के व्याज आकारला जाणार आहे. तसेच चना, सोयाबीन व तूर या तिन्ही मालाचा चेक माल टाकताच त्वरित मिळत आहे.
तारण योजनांच्या कर्जाचा हिशोब काढला असता महिन्याला फक्त एक टक्काचं व्याज पडत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना माल विकण्यापेक्षा बाजार समितीला टाकणे शेतकाऱ्यांच्या सोयीचे व फायद्याचे असून बाजार समितीलाच चना, सोयाबीन व तूर बाजार समितीमध्ये टाकून कर्ज काढून शेतकऱ्यांनी आपला फायदा करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले.
या योजनेचे उदघाटन सभापती संदीप बुरेवार सह उपसभापती संदीप विचू, सचिव रमेश येल्टीवार, ऍड राजीव कासावार, संचालक सुनील ढाले, गजानन मांवकर, विजय पानगणटीवार, बळीराम पेंदोर, सरपंच भगवान चुकलवार, मधुकर चेलपेलवार, विनोद गोडे, कुश केमेकर, भास्कर भोयर, नारायण चटप, अभय दासपेनवार, वसंत राडेवार, तुळशीराम झाडे, आजाद उदकवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमा करीता मनोज अडपावार, दयाकर एनगंटीवार, विठ्ठल उईके, चुकुलवार, नरेश बहादेे यांनी परिश्रम घेतले.