मुकुटबन ग्रामपंचायती मार्फत ५० बचतगटांच्या महिलांना रोजगार
पुढाकार घेऊन रोजगार देणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचयात
सुशील ओझा, झरी: महिलांना सक्षम बनविण्याकरिता ५० बचतगटांना शिलाई मशीन देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन एक वेगळीच छाप निर्माण केली. आजपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचयातीने असा निर्णय घेतला नाही. सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार सचिव कैलास जाधव व सर्वच ग्रामपंचयात महिला पुरुष सदस्य यांनी हा निर्णय घेतला.
मुकुटबन ही तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. ग्रामविकास व विविध योजना अंमलात आणून कार्य करणारी एकमेव ग्रामपंचायत म्हणून नाव लौकिक केले आहे. तसेच २ हजार डस्टबीन गावतील प्रत्येक घरात दिले. मुख्य मार्गावरील दुकानदार पानटपरीवाल्यांना देऊन ग्रामस्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. गावकऱ्यांना शुद्ध पिण्याकरिता पाण्याचे तीन आरो फिल्टर लावले आहे.
लवकरच प्रत्येक बचतगटाच्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप करणार आहे. एकूण ५० बचतगट असून प्रत्येक गटाला एक शिलाई मशीन असे एकूण ५० मशीन वाटप करण्यात येणार आहे. ५० गटातील १५० महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे.
ग्रामपंचयातच्या सभागृहात महिला ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. गटांच्या महिलांना रोजगार म्हणून पिशव्या, बॅग, शालेय पोषाख व थैल्या असे उद्योग करून महिलांना सक्षम बनविण्याच्या ग्रामपंचयातच्या निर्णयाने महिला वर्गात संजीवनी जागली आहे.
गावातील जनतेच्या आरोग्य विषयावर चर्चा करण्यात आली. निरोगी जीवन जगण्याकरिता कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे व कोणते उपाययोजना कराव्या याबाबत वैशाली फुलझले व सपना बक्कीवार यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेला १५० ते २०० बचत गटाच्या महिला व गावकरी उपस्थित होते.
ग्रामपंचयतीच्या प्रत्येक निर्णय सरपंच, उपसरपंच ,सचिव आणि सर्व सदस्य मिळून घेत असल्याने सर्वच काम योग्य होत आहे हे विशेष. ग्रामसभेचे अध्यक्ष शंकर लाकडे होते. उपसरपंच अरुण आगुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर चेलपेलवार ,सचिव कैलास जाधव आरोग्य विभागाचे सपना बक्कीवार व वैशाली फुलझले यावेळी उपस्थित होते.