सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन मुकुटबन ग्रामवासियाना शुद्ध व फिल्टर पाणी देण्याचा निर्धार केला होता. व तो पूर्णत्वास आणून लोकांच्या सेवेत आणला आहे. या शुद्ध व फिल्टर प्लांट चे उदघाटन गावातील सर्वात वयोवृद्ध ९७ वर्षीय महिला इंदिराबाई राजेश्वर डब्बावार हिच्या हस्ते करून एक वेगळाच उपक्रम केल्याने सरपंच व सदस्या विषयी जनतेत प्रशांसा केल्या जात आहे.
कोणत्याही विकास काम की उदघाटन असो त्या कामाचे भूमिपूजन मंत्री, आमदार, वरिष्ट अधिकारी यांच्या हस्ते केल्या जाते परंतु मुकुटबन येथील वॉटर प्लांटचे उदघाटन वयोवृद्ध महिलेच्या हस्ते केल्याने तालुक्यातून सरपंच लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार यांच्या सह सर्वांचे अभिनंदन केल्या जात आहे. मुकुटबन ग्रामवाससीयांना ५ रुपयात २० लीटर थंड व शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने गावातील खाजगी पाणी विक्रेत्यांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
१२ ते १५ हजार लोकसंख्येच्या गावात पाणीटंचाई असतांना सुद्धा गावकर्यांना शुद्ध व थंड पाणी पुरवणारी जिल्ह्यात पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे बोलले जात आहे. उदघाटन करतेवेळी सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, भूमारेड्डी बाजनलावर, मधुकर चेलपेलवार, सत्यनारायण यमजेलवार, बापूराव पुल्लीवार, प्रकाश कोंगलवार, संदिप विचू, रामदास पारशीवे, अशोक कल्लूरवार,सुरेश ताडूरवार, शंकर अक्केवार, भूमारेड्डी एनपोतूलवार, सह महिला ग्रामपंचाय सदस्य उपस्थित होते.