मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक
सुशील ओझा, झरी: दुर्गाउत्सवा निमित्त पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धंनजय जगदाळे व पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत परिसरातील सर्व दुर्गा व शारदा मंडळाचे पदाधिकारी ,पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य हजर होते. सण उत्सवादरम्यान शांतता अबाधित राहावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दुर्गादेवी व शारदादेवी बसण्याच्या पहिल्या दिवसापासून तर उठेपर्यंतच्या दिवसात कोणत्याही मंडळात मूर्तीची विटंबना होऊ नये, मंडळाच्या मंडपात कोणीही जुगार खेळू नये, महिला किंवा मुलींना छेडणाऱ्यावर कडक कार्यावाही होणार, मंडळात कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास मंडळाचे पदाधिकारी जवाबदार राहणार तसेच कोणतीही तक्रार असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
दुर्गा व शारदा उत्सव हे महिलांचे उत्सव असून या उसत्वात तरुण मुलींचाही सहभाग असतो तरी आपल्या मंडळासमोर स्वच्छता, चांगले देखावे सामाजिक कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्ये विषयी कार्यक्रमातून जनजागृती करावे असेही बैठकीत ठाणेदार यांनी सांगितले.
शांतता समितीच्या बैठकीत पोलीस पाटील, मंडळाचे महिला पदाधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमा करिता नीरज पातूरकर, सुलभ उईके, सागर मेश्राम, रमेश मस्के, प्रदीप कवरासे यांनी परिश्रम घेतले.