वणी येथे संत रविदास यांना अभिवादन

स्मृतिदिनी वाहिली समाजबांधवांनी आदरांजली

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत संत रविदास सभागृहात समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांचा ५०० वा स्मृतिदिनाला आदरांजली वाहण्यात आली. संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी आणि संत रविदास युवा मंच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

Birthday

याप्रसंगी सुरूवातीला चर्मकार भगीणी स्मृतिशेष डॉ. शुभांगी हांडे यांना श्रद्धांजलीपर मौन घेऊन श्रद्धांजली वाहन्यात आली. अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थीत असलेले संबाजी वाघमारे, दौलत वाघमारे, राजू वाघमारे,भारत लिपटे, हेमंत वाघमारे, संदिप वाघमारे, किशन कोरडे, विनोद ढेरे, अमोल बांगडे, मिलींद पिंपळकर, रवि कोरडे, वैभव उपाध्ये, शाम गीरडकर यांनी स्मृतिदिन अभिवादनपर तसेच समाज संघटनपर विचार प्रकट केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अभिवादन कार्यक्रमाला चर्मकार समाज बांधव उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश लिपटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि धुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी आणि संत रविदास युवा मंच वणीच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.