मुकुटबन ठाणेदारपदी धनंजय जगदाळे रुजू

0

सुशील ओझा,झरी:  नुकत्याच जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात जिल्ह्यात ४ वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यात. तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विनंती अर्ज व जिल्ह्यातील बदल्याचे आदेश काढले आहे. मुकुटबनचे ठाणेदार गुलाब वाघ यांची बदली बुलडाणा येथे झाली. त्यांच्या जागेवर पुसद येथील धनंजय जगदाळे यांची वर्णी लागली. त्यांनी शनिवारी रात्री आपल्या कामाचे सूत्र हाती घेतले आहे.

 

Podar School 2025

जगदाळे स्वभावाने शांत, शिस्तबद्ध, कडक स्वभावाचे तसेच कायद्यात कुणाशीही तडजोड नाही, नियमाने काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी पुसद येथीलच वाहतूक शाखा, शहर व ग्रामीण तीनही जागेवर त्यांनी आपले चांगले कार्य केल्याची छाप सोडली आहे. मुकुटबन येथील ठाणेदार वाघ यांनी १ वर्ष कडक प्रशासन व सुरळीत पोलीस स्टेशन चा कार्यकाळ सांभाळला. तसेच कार्य नवीन ठाणेदार जगदाळे यांनी सांभाळावे अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.