नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या तसेच शहरातील विविध समस्या व नगर पंचायतीमधील भ्रष्टाचारा आदी विषयांवर गेल्या 13 ऑक्टोबरला स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने प्रशासन दरबारी निवेदन दिले. मात्र त्याची प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नसल्याने अखेर येत्या 29 ऑक्टोबरला मुंडण आंदोलन करणार असल्याच्या इशारा संघटनेने दिला. त्याचे स्मरणपत्र मारेगावच्या तहसिलदारांना दिले.
तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गजानन किन्हेकार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून “स्वराज्य शेतकरी युवा संघटनेची” स्थापना केली. संघटनेच्या वतीने गेल्या 13 ऑक्टोबरला शेतकरी शेतमजूर, नगरपंचायत वगैरे विविध समस्यांचे निराकरण व नगरपंचायतीमधील काही भ्रष्टाचार आदी मागण्या घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते.
मागण्या मुदतीच्या आत मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता.अखेर निवेदनाची कुठलीच दखल प्रशासन दरबारी झाली नसल्याने, मागण्या मंजूर न झाल्यास येत्या 29 ऑक्टोबरला मुंडण आंदोलन करत असल्याच्या इशाऱ्याचे स्मरणपत्र तहसीलदार व ठाणेदार मारेगाव यांना देण्यात आले.
यावेळी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या मार्गदर्शनात सचिन पचारे, विशाल किन्हेकार, विजय मेश्राम, राजू मांदाडे, तुकाराम वासाडे, राजू खडसे, सोमेश्वर गेडेकर , अनिल राऊत, गोपाल खामनकर, विकास राऊत, अभय गवळी, भोजराज मस्की, प्रवीण काळे, अतुल देवगडे, पवन नेहारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)