सुधीर मुनगंटीवारांची गुरुवारी दुर्गा माता मंदिराला भेट
संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती
बहुगुणी डेस्क, वणी : शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिराला महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भेट देणार आहेत. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस असल्याने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळी 11:30 वाजता सुधीर मुनगंटीवार आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते दुर्गा माता मंदिरात महाआरती होणार आहे. या महाआरतीसाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.
याशिवाय, मंदिरात माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. दरवर्षी शक्तीपीठातून आणली जाणारी ही ज्योत या वर्षी 22 सप्टेंबरला हरियाणा कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची आहे. विधीपूर्ण स्थापनेनंतर नवरात्र उत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू झाला असून, रोज हजारो भक्त दर्शन घेत आहेत.



Comments are closed.