साहेब! आम्ही ‘हे’देखील करायला तयार आहोत….

मार्च एंडिंगच्या तोंडावर अनेक करदात्यांचे मोडले कंबरडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्च एंडिंग म्हणजे मध्यमवर्गियांपासून सर्वांचाच खूप महत्त्वाचा विषय. या 31 मार्चला चालू आर्थिक वर्ष समाप्त होईल. सोबतच अनेकांची धाकधूकही वाढेल. अनेक वणीकरांनी अजूनही या वर्षाचा मालमत्ता व पाणी कर भरला नाही. हा कर भरण्याकरिता ते वणी नगर पालिकेत येत आहेत. हा कर आतापर्यंत न भरल्यामुळे त्यांची त्यावरील दंडाची रक्कमच जास्त झाली आहे. त्यामुळे ही दंडाची रक्कम कमी करण्यात यावी याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले. करदाते मूळ कर भरायला तयार आहेत. मात्र ही दंडाची रक्कम माफ करावी. अशी सर्वांच्या वतीनं वणी शहर सेवा दल कॉंग्रेसने मागणी केली आहे. तसं निवेदन त्यांनी वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं आहे.

करधारकांना प्रति वर्षाला भरण्यात येणाऱ्या करावर पालिकेच्या वतीने दंड लावण्यात येत असतो. त्यामुळे करधारकांना अतिरिक्त आर्थिक बोजा सहन कराव लागतो. त्यामुळे मागील वर्षाला ज्या प्रमाणे दंडाची रक्कम 100% माफ झाली होती, तशीच याही वर्षी व्हावी अशी नागरिकांची विनंती आहे. यामुळे मागील वर्षी न. प. सर्वसाधारण फंडात भरपूर प्रमाणात निधी जमा झाला. नागरीकांनी कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिला. तीच मागणी याही वर्षीदेखील होत आहे. जेणेकरून मालमत्ता कर व पाणी कर भरून अनेकजण करमुक्त होतील. न. प. फंडात जास्तीत जास्त निधी जमा होईल. ज्याचा शहरातील विकासकामांत करता येईल. यावेळी वणी शहर सेवा दल कॉंग्रेसचे प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे, विलास कालकर, रवि कोटावार, महेश टिपले, सलीम खाँ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.