विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी-शिंदोला रोडवर असलेल्या आबई फाट्याजवळ असलेल्या एका बारमध्ये गेलेल्या मित्रांचा वाद झाला. वादाचे पर्यावसन भांडणात होऊन यात एका मित्राने दुस-या मित्रावर रॉडने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. आकाश हरी गोवारदीपे (22) असे मृतकाचे नाव असून तो वेळाबाई येथील रहिवाशी होता. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मित्रांमध्ये शुल्लक कारनावरून झालेल्या वादामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
सविस्तर वृत्त असे की आकाश हरी गोवारदीपे (22) हा वेळाबाई येथील रहिवाशी होता. तो रविवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आकाश काही मित्रांसह पार्टी करण्यासाठी शिंदोला रोडवरील आबई फाटा येथे नुकत्याच सुरू झालेल्या वेलडन नामक बार आणि रेस्टॉरन्टमध्ये गेला होता. बारमध्ये शुल्लक कारणांवरून आकाशचा मित्रांसोबत वाद झाला.
दरम्यान हे सर्व बारमधून बाहेर आले. बारसमोर त्यांचे आणखी जोरदार भांडण झाले. आरोपी गोलू उर्फ प्रतिक चंद्रभान वडसकर (28) याने आकाशच्या डोक्यावर रॉडने जोरदार प्रहार केला. यात आकाश जखमी झाला. मित्रांनीच आकाशला वेळाबाई येथील एका खासगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी आकाशला चंद्रपूर येथे रेफर केले. आकाशला चंद्रपूर येथे नेण्याची तयारी सुरू असतानाच गावातच आकाशचा मृत्यू झाला.
दरम्यान महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने शिरपूर पोलीस स्टेसनचे सपोनि गजानन करेवाड हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत होते. त्यांना बारसमोर राडा झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना आकाशचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी आरोपी गोलू उर्फ प्रतीक वडस्कर याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात घटना दिसून आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी गोलू उर्फ प्रतीक वडस्कर व आरोपी सोमेश्वर गजाजन काळे (19) दोघेही राहणार वेळाबाई यांना अटक केली. मृतकाची आई माया हरीदास गोपारदीपे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भादंविच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलिप भूजबळ पाटील, अ.पो अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन करेवाड, रामेश्वर कांडूरे, अनिल सुरपाम, गंगाधर घोडाम, सुगद दिवेकर, प्रमोद जुनूनकर, गजानन सावकाकळे, अभिजीत कोष्टवार यांनी केली.
हे देखील वाचा:
Comments are closed.