चारगाव चौकी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

दाराच्या फ्रेम मध्ये दडलेल्या सापाचा दंश

विवेक तोटेवार, वणी: 11 ऑक्टोबर दुपारी 1 वाजताच्या सुमारास चारगाव चौकी येथे एका इसमास घरीच सापाने चावा घेतला. अस्वस्थ असलेल्या इसमास आधी शिरपूर येथे व नंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. परंतु दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पवन वसंता पचारे (27) रा. चारगाव चौकी येथील रहिवाशी होता. तो आई, बहीण व भावासह राहायचा. दरम्यान आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास पवन हा घराबाहेर पडत होता. दरम्यान घराच्या दाराच्या फ्रेममध्ये एक विषारी साप दडून होता. त्या सापाने पवनला दंश केला.

सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच पवनला सुरवातीला शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. परंतु डॉ. ऐश्वर्या सहारे यांनी त्याला मृत घोषित केले. साप कोणत्या जातीचा होता याबाबत कोणतीही महिती मिळू शकली नाही. मृतकाचा भाऊ गुरुदेव याच्या माहितीवरून वणी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

बारसमोर मद्यधुंद अवस्थेत मित्रांचा राडा, मारहाणीत एकाचा मृत्यू

 

Comments are closed.