लतादीदींना अमरावतीच्या कलावंतांची संगीतमय आदरांजली

 सुमधुर गीतांनी जागवल्या गाण कोकीळेच्या आठवणी...

अमरावती: केवळ भारत देशच नाही तर परदेशातही आपल्या आवाजातून श्रोत्यांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवणा-या लता मंगेशकर यांना अमरावतीकरांनी संगीतातून आदरांजली वाहिली. 8 मे रोजी अभियंता भवन शेगाव नाका, अमरावती येथे सायंकाळी 7 वाजता ‘रहे ना रहे हम…’ हा संगीतमय आदरांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक गायक अनंता देशपांडे होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन गुढे यांनी केले. बुलढाणा अर्बन परिवार आणि क्रिएटिव्ह ग्रुप अमरावतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संगीत रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. भोजराज चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भोजराज चौधरी, सुहासिनी शेट्टी, रमेशजी राठी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सह गायक म्हणून प्रमोद ढगे, डॉ. नयना दापुरकर, राहुल वरुडकर, गुरूमूर्ती चावली, शिरिषा चावली आदींची उपस्थिती होती, सुरुवातील लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून मान्यवरांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मान्यवरांनी आपले श्रद्धांजलीपर मनोगत देखील व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘रहे ना रहे हम’ या गीताने करण्यात आली. त्यानंतर लतादीदींनी गायलेले गाणे स्थानिक गायक कलावंतांद्वारे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या अनंत देशपांडे यांच्या गाण्यांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. अनेक गीतांना श्रोत्यांनी वन्स मोर देखील दिला.
कार्यक्रमाला सिंथेसायझरवर सचिन गुडे, ऑक्टोपॅडवर राजदीप चावरे, तबल्यावर विशाल पांडे, गिटारवर मोहीत चौधरी, व्हायोलिनवर हरिष लांडगे, तर ढोलकरवर विनोद थोरात यांनी सुरेख साथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंडिया वॉइस फेस्ट मध्ये दोन कॅटेगरीमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अनाउंसर नासीर खान यांनी केले.
या कार्यक्रमाची सांगता ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अमरावतीकर रसिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती विभागातील विभागीय व्यवस्थापक नितीन काळे, विठ्ठलराव सावरकर, नितीन भगत, पुरोषत्तम टावरी, अंजली देशमुख, नीलेश लद्धा, घनशाम मुंदडा यांनी परिश्रम घेतले.
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!