ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

येसेकर शिवणकला विद्यालयात लवकरच नवीन बॅचला सुरूवात

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील डॉ. आंबेडकर चौकातील सुप्रसिद्ध येसेकर शिवणकला विद्यालयात ड्रेस डिझायनिंग, एमब्रायडरी, मेहंदी इत्यादी विषयाच्या सर्टिफिकीट कोर्ससाठी नवीन बॅचेस लवकरच सुरू होणार आहे. या कोर्समध्ये ड्रेसचे विविध प्रकार, ब्लाऊजचे विविध प्रकार, मेहंदीचे विविध प्रकार, एम्ब्रायडरीचे विविध प्रकार शिकवण्यात येईल. त्यासाठी इच्छुक विद्यार्थीनी व महिलांनी आंबेडकर चौक येथील येसेकर शिवणकला विद्यालयात दुपारी 12 ते 5 या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवणकला हा महिलांच्या स्वावलंबी होण्याचा मार्ग: सौ. मंदाताई येसेकर
शिवणकला ही केवळ कला नसून महिलांसाठी तो एक स्वावलंबी होण्याचा मार्ग आहे. आम्ही 1987 पासून शिवणकला विद्यालयात प्रशिक्षण देत आहोत. दैनंदिन उपयोग, हौस किंवा एक व्यवसाय म्हणूनही शिवणकलेकडे पाहिले जाते. कोविड काळात शासनाच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही विद्यालय बंद ठेवले होते. मात्र आता लवकरच नवीन बॅच सुरू करण्यात येत आहे.
– सौ. मंदाताई येसेकर, संचालिका
येसेकर शिवणकला विद्यालय, वणी

येसेकर शिवणकला विद्यालयाची  सर्वात जुने शिवणकला विद्यालय म्हणून ओळख आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थीनी व महिलांनी येथून प्रशिक्षण घेतले आहे. तर अनेक महिला येथून प्रशिक्षण घेऊन आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. नवीन बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थीनी व महिलांनी 12 ते 5 या वेळेत (रविवार बंद) संपर्क साधावा असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

True Care

अधिक माहितीसाठी संपर्क: सौ. मंदाताई येसेकर, संचालिका
मो. 9137780791
पत्ता: येसेकर शिवणकला विद्यालय
डॉ. आंबेडकर चौक, दुर्गा माता मंदिराजवळ, वणी

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!