मुस्लिम समाजातर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
10 दिवस पुरेल इतक्या किराना मालाचे मजुरांना वाटप
नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या संचारबंदीमुळे मजुरवर्गाचे काम बंद आहे. त्यामुळे अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतील मारेगाव शहरातील मस्लिम समाज बांधव पुढे आले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधील मुस्लिम समुदायाने शहरातील मोलमजूरी करणाऱ्या शेकडो गरजू कुटुंबाना दहा दिवस पुरेल इतके अन्नधान्य, व जिवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप केले.
एकीकडे कोरोना आजाराची दहशत तर दुसरीकडे उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सध्या मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबियासमोर उभा ठाकला आहे. विशेष करून ज्यांना रोज काम केल्या शिवाय घर खर्च भागविता येत नाही अशा कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबियांची अडचण लक्षात घेऊन मुस्लिम समुदायाने त्यांना मदतीचा हात दिला आहे. जाती धर्म न बघता मजुरांकडे केवळ एक गरजू म्हणून मदत केल्याने मारेगावात त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.