मेडिकल स्टोअर्स सुसाट, तर बँका मोकाट…

बँकेत मार्किंगची व्यवस्था नाही, लोकांची एकच गर्दी

0 546

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगची उपाययोजना सांगितली आहे. एकमेकांना स्पर्श करू नये तसेच तीन चारा फुटाचे अंतर राखावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र याचा आदेशाचा फज्जा उडताना दिसत आहे. वणीमध्ये मेडिकलमध्ये तर ही उपाययोजना प्रभावीपणे लागू होताना दिसत आहे पण बँकेत मात्र या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे.

संचारबंदी च्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंचे दुकान. मेडिकल व बँक सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र इथे गर्दी करू नये तसेच दोन व्यक्तींमध्ये काही फुटांचे अंतर राखण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी किराणा दुकान व मेडीलक स्टोअर्समध्ये गर्दी होणार नाही या करिता बाहेर अंतर ठेऊन मार्किंग करण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या गर्दीवर नियोजन होताना दिसत आहे.

मात्र शहरातील काही बँकांच्या बाबतीत हे चित्र जर वेगळे दिसत आहे. प्रशासनाने सर्वात आधी बँकानाच हे आदेश दिले आहे. बँकेत एका काउंटरवर एक तसेच दोन ग्राहकांमध्ये मार्किंग किंवा दोरी लावून अंतर ठेवण्याची उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र बँकेने त्याबाबत कोणतेही आवश्यक पाऊल उचललेले दिसत नाही. लोक बँकेच्या बाहेरच गृपने गर्दी करतानाचे चित्र सध्या वणीत आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश दिले आहे. तसेच घराबाहेर पडू नये व सोशल डिस्टन्सिंगचे आदेश दिले आहे. याचा उद्देश हाच आहे की कोरोनाची बाधा कुणाला झाली तर तो पसरू नये. मात्र याची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे संचारबंदी, लॉकडाऊन याला अर्थ उरत नसल्याचे दिसत आहे.

Comments
Loading...