रफीक कनोजे, मुकूटबन: कृषी उत्पन्न बाजार समितीच्यायार्ड मध्ये नाफेड तर्फे सोयाबिन खरेदी केन्द्राचा मंगळवारी सकाळी मुहुर्त झाला. कृषि उत्पन्न समितीचे संचालक व सचिव यांच्या मार्फत हा मुहुर्त करण्यात आला. यात सोयाबिनला ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. मुकुटबन येथील शेतकरी माधव कोडपकवार यांना संदीप बुर्रेवार (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, झरी) यांनी हार घालुन त्यांच्या सोयाबीनचा काटा करुन त्यांना ३ हजार ५० रुपये भाव देण्यात आला. सोयाबिनला १२ टक्के (ओलावा) माईश्चर सुट देण्यात येणार आहे.
शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. सोयाबिनात ओलावा असल्याचं कारण समोर करीत नाफेड खरेदी केन्द्रे दिवाळीच्या १५ दिवसानंतर सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली. अनेक व्यापाऱ्यांनी खेड़ा खरेदी सुरु करुन गरीब शेतकऱ्यांचे कवडी मोल भावाने खरेदी केली. परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे पीक खराब झाले. काही प्रमाणात सोयाबीन ओलं झालं त्यामुळे खरेदी उशीरा करण्यात आली. ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के करण्यात यावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघातर्फे ठराव घेण्यात घेवून शासनाकडे पाठवून पाठपुरावा करु असा तोंडी आदेश संचालक गजानन मांडवकर यांनी दोन्ही संचालक मंडळाना दिला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सचिव रमेश येल्टीवार, सभापती संदिप बुर्रेवार, उपसभापती संदीप विंचू, संचालक बापूराव जिन्नावार, गजानन मांडवकर, सुनील ढाले, विजय पनगंटीवार, प्रभाकर मंदावार, बळीराम पेटीवार, विलास धनवल्कर, संतोष माहुरे, प्रवीन विधाते, चक्रधर तिर्थगिरीकर, अशोकरेड्डी बोदकुरवार, रमेश उदकवार व इतर मान्यवर हजर होते.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )