धक्कादायक… शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले

उर्जा मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली, तीन गावातील शेतक-यांची धडक

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्याचा कालावधी होता, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी ह्या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच दिवशी केली. त्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत बिल असलेली वीज कनेक्शन १५ नोव्हेंबर पर्यंत न कापण्याचा आदेश उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. मात्र असे असताना वणी तालुक्यातील मोहदा सबस्टेशन वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी उर्जामंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित मोहदा, कृष्णाणपुर व वेळाबाई येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले आहे. ऐन रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना वीज वितरण कंपनीनं अडथळा निर्माण करुन एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय केला असल्याची भावना शेतक-यात निर्माण झाली आहे. याविरोधात शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली.

इकडे शासनाचा आदेश काढायचा अन् विजवितरण कंपणी वसुलीच्या नावावर शेतकऱ्याच्या शेतातील वीज न कापण्याचा शासनाचा आदेश आलाच नसल्याचा बहाना करीत आहे. वीज वितरण कंपनीच्या या कृत्याचा निषेध करीत सदर शेतकऱ्यांनी आमदार संजिवरेड्डी बोतकुलवार यांच्याकडे धाव घेत, शासनाचा आदेश दाखवत वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. आमची बंद झालेली वीज कनेक्शन त्वरित चालु करुन, शासनाच्या आदेशाचे पालन करावे, अन्यथा मोहदा, कृष्णाणपुर, वेळाबाई येथील शेतकरी वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा शेतकर्यानी दिला आहे. यावेळी आमदारंनी कृषीपंपाची लाईन सुरु करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं.

वीज वितरण कंपनीच्या कृषी पंपाची वीज कापल्याने चालु हंगामाचे व रब्बी हंगामाचे नुकसान होणार नाही याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी तिन्ही गावातील शेतक-यांनी केली. यावेळी छगन कुचनकर, धीरज राजुरकर, ज्ञानेश्वर पारखी, गणेश कुचनकर, अजय कुचनकर, दिलीप ढुमणे, निर्बड (कृष्णानपुर) व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते,

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

Leave A Reply

Your email address will not be published.