देवेंद्र खरबडे, वणी: नगर परिषद वणीत 9 मराठी माध्यमांचा शाळा, एक हिंदी व एक उर्दू अशा एकूण 11 शाळा आहेत. या सर्व शाळा डिजिटल झाल्या असून इथे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळणार आहे. नुकताच वणीमध्ये ई-लर्निंग साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगर पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल झाल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रिय मंत्री हंसराज अहिर म्हणाले की डिजिटल इंडियाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीत वणी नगर परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आम्ही पाळले असून नगर परिषदेच्या सर्व मराठी शाळांमध्ये इ-लर्निंग सुरू झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर परिषदेने सर्व शाळा डिजिटल करण्याचा बहुमान मिळविला आहे. ही ऩक्कीच वणीसाठी अभिमानाची बाब आहे. नगरपालिकेची शाळा म्हणजे गोरगरीबांची शाळा. शाळा डिजिटल झाल्याने आता गोरगरीब विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळणार. यापुढेही अनेक उपक्रम राबवून पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरू असणार आहे.
कार्यक्रमात केक कापून वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकांनी अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी नगर परिषदेच्या शाळेतच आपल्या मुलांना शिकवावे असे आवाहन केले. पाहुण्यांच्या हस्ते सर्व शाळांना इ-लर्निंगचे साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिनकरराव पावडे, खनिज विकास समिती सदस्य विजय पिदूरकर, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यासोबत शिक्षण सभापती आरतीताई वांढरे, सभापती गण संतोष पारखी, सुभाष वाघळकर, वर्षाताई खुसपुरे, सदस्य प्रा. महादेव खाडे, नितीन चहानकर, रंजुताई झाडे, मंजुषाताई झाडे, निलेश होले, प्रीती बिडकर, संगीता भंडारी, मनीषा लोणारे, प्रशांत निमकर, ममता अवताडे, शालीक उरकुडे, अक्षता चौहान, स्वाती खरवडे माया ढुरके, रंजना उईके, चंद्रकांत फेरवानी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन दिलीप कोरपेनवार यांनी केले. आभार मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर यांनी केले.