महावितरणने पाठवले चक्क २८ लाख रुपयांचं बिल

विजवितरण कंपनीचा गलथान कारभार समोर

0

तालुका प्रतिनिधि, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील एका महिला घरगुती वीज ग्राहकाला विज वितरण कंपणी कडुन चक्क २८ लाख रुपयांच्या वर वीज प्राप्त झालं आहे. या प्रकाराने वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे कुसुम वासुदेव आस्वले ही महिला राहते. तिला चालू महिन्याचे वीज बिल चक्क २८ लाख,१३ हजार, ९९० रुपये आलेलं आहे. बिल पाहताच महिलेला चांगलाच घाम फुटला. त्यांनी या बिलाबाबत चौकशी केली असता वीज वितरण कंपनीने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगितले.

गेल्या काही महिन्यात चुकीचे बिल पाठवण्याच्या घटना सारख्या समोर येत आहे. हे लाखोंचं बिल असल्याने ते बिल दुरुस्त करता येईल. मात्र अशा प्रकाराचा मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अशा चुकीच्या बिलाची शहानिशी करूनच ग्राहकाला बिल वितरीत करावे अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.