संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी (पूर्व) अजय धोबे

0

मारेगाव: संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हा (पूर्व) अध्यक्षपदी वणीतील समााजिक कार्यात अग्रेसर राहणा-या अजय धोबे यांची निवड करण्यात आली आहे. सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टी येथे केन्द्रीय कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे.

अजय धोबे आणि सूरज खोब्रागडे यांच्या निवडीने संभाजी ब्रिगेडचे कार्य जोमाने वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांची निवड झाल्याने मारेगाव, वणी, झरी ,पांढरकवडा या तालुक्यातील संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी अजय धोबे यांचे अभिनंदन केले आहे. सिंदखेडराजा येथे झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मा. मनोज आखरे (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र), सुधीर देशमुख, सौरभ खेडेकर, विनोद हागोने, डॉ. अभय गावंडे, प्रा. शिवानंद भाणुशे, प्रा. दिलीप चौधरी, सुहास राणे व इत्यादी संभाजी ब्रिगेड पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड पक्ष म्हणून उदयास आल्याला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. समाजकारणा बरोबर राजकारणात सक्रिय होऊन जनतेला ख-या अर्थाने न्याय देण्याचं काम संभाजी ब्रिगेड गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून करित आहे. १००% राजकारण आणि १००% समाजकारणावर विश्वास ठेऊन संभाजी ब्रिगेड वाटचाल करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.