प्रभाग क्रमांक 3 च्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष

दिग्गज उतरले एकाच प्रभागात, उमेदवारी परत घेण्याकडे सर्वांचे लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढलेल्या चुरसीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण सात उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. त्यापैकी सातही नामांकन वैध ठरले आहेत. या प्रभागात सर्वाधिक दिग्गज उमेदवार असल्याने या प्रभागाकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार आहे यावर देखील निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी नगरसेवक भारत मत्ते, काँग्रेस पक्षाकडून विशाल किन्हेकर, शिवसेनेचे पुंडलीक कापसे, भाजपतर्फे विलास चिंचुलकर, अपक्ष नंदेश्वर आसुटकर, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष रामदास उर्फ ज्योतिबा पोटे, बंडू गोलर यांचा समावेश आहे. यात एक दोन उमेदवार सोडले तर सर्व उमेवदवार हे तुल्यबळ आहे.

नेमके चित्र अजून स्पष्ट व्हायला वेळ असला तरी मात्र आतापासूनच या प्रभागाकडे शहराचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे. कारण या प्रभागामध्ये दोन माजी नगरसेवक तसेच तीन इतर पक्षांचे प्रमुख नेते उभे आहेत. भारत मत्ते हे नगरपंचायतचे माजी नगरसेवक आहे. नंदेश्वर आसूटकर हे माजी पाणीपुरवठा सभापती होते. विशाल किन्हेकर यांनी नुकताच स्वराज्य युवा संघटनेतून काँग्रेसमधून प्रवेश केला आहे. रामदास उर्फ ज्योतिबा पोटे हे संभाजी ब्रिगेड पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेने येथून पुंडलीक कापसेंना उमेदवारी दिली आहे.

प्रथम आरक्षण जाहीर झाले तेव्हापासून नंदेश्वर आसुटकर यांनी या प्रभागामध्ये तयारी सुरू केली होती. परंतु दुसऱ्यांदा आरक्षण सोडत निघाली आणि या प्रभागातील खऱ्या अर्थाने चुरस वाढली. काँग्रेस पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या शहराचा युवा चेहरा म्हणून पाहिल्या जात असलेल्या विशाल किन्हेकर याला पक्षाने सीट दिली. त्यामुळे नाराज झालेल्या नंदेश्वर आसुटकर यांनी अपक्ष उमेदवारी नामांकन दाखल केले. आता नामांकन मागे घेण्याच्या दिवसापर्यंत काय हालचाली होतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहेत.

नामांकन परत घेण्यावर निवडणुकीचे गणित अवलंबून
या प्रभागामध्ये धनदांडगे यांचा प्रवेश झाल्याने निवडणूक चुरशीची होईल यात संशय नाही. परंतु काँग्रेसचे अपक्ष अर्ज दाखल केलेले नंदेश्वर आसुटकर आपले नामांकन कायम ठेवतात की परत घेतात हे येणाऱ्या काळात कळेलच. कारण काँग्रेसमध्ये बंडखोरी होते की पक्ष नंदेश्वर आसुटकर यांना थांबवते यावरच या प्रभागातील गणित अवलंबून आहे.

हे देखील वाचा:

वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा

बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.