मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीचे 6 नामांकन रद्द

97 नामांकनापैकी 91 नामांकने कायम

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उमेदवारांच्या नामांकन अर्जाची आज छाननी झाली. यात एकूण 6 नामांकन अर्ज अवैध ठरले असून एकूण 91 उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहे.

21 डिसेंबरमध्ये होणाऱ्या मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी काल दि. 7 डिसेंबरला नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 97 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आज प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली. यात एकूण 6 नामांकन अर्ज अवैध ठरले.

उर्वरित 91 नामांकनामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 उमेदवार, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 10 मध्ये 8, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 6,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 12 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 13 मध्ये 6, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 6, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 9 आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये 6 एवढे उमेदवार उभे असून नामांकन परत घेण्याच्या दिवशी किती उमेदवार नामांकन परत घेतात यावर पुढील गणित अवलंबून आहे.

प्रभाग क्रमांक 5, 6 व 14 मध्ये ओबीसी आरक्षण होते. परंतु न्यायालयाने निर्णय देत या प्रभागातील निवडणुका काही काळासाठी रद्द केल्याने या तिन्ही प्रभागातील निवडणुका न्यायालयाच्या निर्णयानंतरच होणार आहेत.

हे देखील वाचा:

बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक

वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा

Comments are closed.