गिरिश कुबडे, वणी: नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या पटांगणात वर्ग 5 वी ते 8 व्या वर्गापर्यंतच्या मुलींनी बसून देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकदादाला छान भावपूर्ण पत्र लिहून संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे असा संदेश देऊन अक्षता व राख्या टाकून लिफाफा तयार करून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या सुपूर्द केला. सदर पत्र केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांच्या मार्फत देशाच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
या प्रसंगी मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर, शिक्षण सभापती आरती वांढरे, बांधकाम सभापती वर्षा खुसपुरे, रंजू झाडे, मंजूषा झाडे, धनराज भोंगळे, मनीषा लोणारे, शालीक उरकुडे, अक्षदा चव्हाण, स्वाती खरवडे, माया ढुरके, रंजना उईके इत्यादी नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेविकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. आभार प्रशासन अधिकारी संजय पवार यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद व नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Next Post