बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतीने 25 रोजी नशामुक्तीचा संदेश घेऊन नमो युवा रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पाऊस असूनही स्पर्धकांचा उत्साह कायम होता. स्पर्धेनंतर लगेच विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
16 वर्षांखालील गटातील विजेते
16 वर्षांखालील मुलांमध्ये शिवम ओझा याने प्रथम क्रमांक पटकावला. निल नाले याने द्वितीय क्रमांक मिळवला. शिवम कुईटे याने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप बक्षिस देण्यात आले. हसन सैय्यद, नैतिक उज्वलकर आणि मोहम्मद फैय्याज अली यांना त्यांना प्रत्येकी 500 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात आले.
16 वर्षांखालील मुलींमध्ये श्रद्धा प्रेमराज देशमुख हिने प्रथम क्रमांक मिळवला. रेवती भालचंद्र ताजणे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. सादिया इसराईल खान हिने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप बक्षिस देण्यात आले. तर सोनाक्षी खुसपुरे, वैष्णवी सोनवणे आणि समृद्धी गाडगे यांना प्रत्येकी 500 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात आले.
16 वर्षांवरील गटातील विजेते
16 वर्षांवरील मुलांमध्ये क्रिश मिस्त्री याने प्रथम क्रमांक मिळवला. आकाश ठमके याने द्वितीय क्रमांक मिळवला. साई कोट्टी याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप बक्षिस म्हणून देण्यात आले. यश ठेंगणे, शुभम वांढरे आणि अवि बुच्चे यांना प्रत्येकी 1000 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात आले.

16 वर्षांवरील मुलींमध्ये प्रियंका आवारी हिने प्रथम क्रमांक मिळवला. प्रशांती वसाके हिने द्वितीय क्रमांक मिळवला. समृद्धी पावडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, व 2 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप बक्षिस देण्यात आले. नेहा कुत्तरमारे, मोनिका जाधव आणि प्रिया बेलेकर यांना प्रत्येकी 1000 रुपये, सन्मानचिन्ह आणि चंदनाचे रोप प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात आले.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर, यवतमाळ जिल्हा सचिव संतोष डंभारे आणि वणी विधानसभेचे इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन वणी शहर मंडळ अध्यक्ष नीलेश माया महादेवराव चौधरी, वणी तालुका ग्रामीण अध्यक्ष प्रदिप जेउरकर, मिरा पोतराजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वणी शहर मंडळ सचिव राजू गव्हाणे यांनी केले.



Comments are closed.