नरसम्मा महाविद्यालयामध्ये संस्थेचा स्थापनादिन
महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: श्रीमती नरसम्मा हिरया शैक्षणिक ट्रस्ट संस्थेचा स्थापनादिन साजरा झाला. तसेच संस्थेद्वारा संचालित श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी वर्ष आणि संस्थेद्वारा नव्याने सुरू होणाऱ्या शिशुवाटीकेचा उद्घाटन सोहळा झाला. सोहळ्याचे अध्यक्ष चंद्रशेखर भोंदू होते.
उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केलं. विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय विद्याभारतीचे विदर्भ आणि देवगिरी प्रांतचे संघटनमंत्री शैलेश जोशी होते. ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावर मार्गदर्शनही याप्रसंगी त्यांनी केले.
कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा लोगो आणि संस्थेचा व महाविद्यालयाचा आढावा घेणारा माहितीपर लघुपट प्रसारित करण्यात आला. संस्थेच्या विस्तृत माहितीपर आढावा संस्थेचे सचिव राम महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणांमधून घेतलं . महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्यात.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट यांनी स्वागतपर भाषण केले. या वर्षांमध्ये घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणामधून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संस्थेच्या कार्याची तसेच महाविद्यालयाच्या वाटचालीची प्रशंसा केली. उदात्त विचारांवर ही संस्था वाटचाल करीत असून संस्थेची खरी प्रेरणा दानदात्या श्रीमती नरसम्मा हिरय्या मन्नेवार याच ठरतात असे प्रतिपादन केले. वर्तमान शिक्षणव्यवस्थेसंदर्भातही सूचक असे मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमात लाभलेले विशेष अतिथी शैलेश जोशी यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. धोरणासंदर्भात अगदी पूर्वप्राथमिक शिक्षणापासून तर पदवीत्तर आणि आणि संशोधन पातळीपर्यंत प्रस्तुत शिक्षण कशा पद्धतीचे असेल या विषयाचे सखोल माहिती दिली. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी हे शैक्षणिक धोरण फलदायी स्वरूपाचे ठरेल. असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल.
अध्यक्षीय भाषणामधून चंद्रशेखर यांनी उपस्थित व सहभागी सर्व मान्यवरांचे आभार मानलेत. नरसम्मा शैक्षणिक संकुलमध्ये शिक्षण व संस्कार यातून ज्ञानाचा दिशेने होणाऱ्या प्रवासातील समन्वयवादी विचार व्यक्त केलेत. मातृभाषेची शिक्षणामध्ये असणारी गरजही त्यांनी सांगितली. त्याचबरोबर भारत हा ज्ञानकेंद्र व्हावा. उत्तमोत्तम संशोधक देशांमध्ये निर्माण व्हावेत. या दृष्टिने ‘नवीन शैक्षणिक धोरण’ अतिशय उपयोगी ठरणारे असल्याचे म्हटले. या धोरणाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.
आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त श्यामसुंदर राठी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व अतिथींचा परिचय प्रा. डॉ. पंकज वानखडे यांनी केले. कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती विभाग प्रचारक अमित तुरणकर व संस्थेचे कोषाध्यक्ष गोविंद पांडे, विश्वस्त सुनील सरोदे, श्यामसुंदर राठी, अनिता व्यवहारे, कुंजन वेद यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. अन्य संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त हे आभासी पद्धतीने सहभागी होते. प्रा. सुनील पाठक यांचे तांत्रिक सहकार्य सदर कार्यक्रमात लाभले. कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी दूरदृश्यतंत्र प्रणालीने सहभागी झाले होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)