नवरगावच्या देशी दारू दुकाना साठी आज मतदान

५०% महिलांचे मतदान आवश्यक

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील विराणी ब्रदर्स सिएल-३क्र.२०/२०१८-१९ हे देशी दारूचे दुकाण बंद करन्यासाठी महिलाशक्तीने पुढाकार घेतला आहे. यासाठी होणाऱ्या मतदानातुन नवरगाव येथील दारूचे दुकाण बंद होणार की चालूच राहणार याकडे आज देशी दारुच्या होणाऱ्या मतदाना कड़े अवघ्या मारेगाव तालुक्याच्या परीसराचे लक्ष लागले आहे.

Podar School 2025

नवरगाव येथील महिलांनी संयुक्तरीत्या निवेदन राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा यांना सादर केले. त्यात २५% पेक्षा जास्त महिला मतदाराच्या स्वाक्षरी असल्याने महिला शक्तीच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दि.३० सप्टेंबरला नवरगाव येथील देशी दारूचे दुकाण बंद करन्यासाठी महिलाचे गुप्त मतदान घेन्याचा निर्णय घेतला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.एम.आय.एस.११०/ जि.आर.७/ई.एच.सी.-३दि.१२ फेब्रुवारी २००९ मधील नियम क्र ३ नुसार नवरगाव येथील देशी दारु दुकाण बंद करन्यासाठी महिला मतदाराची निवडणूक घेन्यात येत असल्याचे मारेगाव चे तहसीलदार विजय साळवे, निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार दासरवार यांनी माहिती दिली असुन,सदर मतदान नवरगाव येथील जि.प.शाळेत सकाळी ८ ते ५ या वेळेत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.