जामनीमध्ये नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल
म्याकलवार परिवाराची परंपरा यावर्षीही कायम
सुशील ओझा, झरी: तालुक्यतील जामनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश म्याकलवार परिवार महांकाली मंदिरात नवरात्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षीही ही परंपरा कायम आहे. जामनीमध्ये १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम तसेच भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजता कलश स्थापन करण्यात येणार आहे. ह भ प प्रशांत महाराज भोयर यांच्या वाणीतून भागवत कथा होणार आहे. नवरात्रच्या नऊ दिवस दररोज पहाटे ५.३० वाजता देवीची आरती होणार आहे. तर सकाळी ६ ते ८ वाजता ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. सकाळी १० ते १२ वाजता देवी भागवत कथेच आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ (ह.भ.प नागरकर महाराज यांच्या वाणीतून) सायं ७.०५ वा. देवीची आरती व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत भजन व कीर्तन आहे. या कार्यक्रम करिता भागवत, कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण, ह.भ. प महाराज मत्ते, शेषराव आस्वले, रामदास पेंदोर, गणेश तेलरंधे, गणेश पराते, मोरेश्वर सरोदे, नागरकर महाराज तसेच किसन खापर्डे, पतीग महाराज, डोहे गुरुजी, गंगाराज महाराज, झिबला भोंग, तुकाराम आत्राम, रघुनाथ भोयर, नितीन निंदेकर, सचिन बोरकर हे करणार आहेत.
१७ ऑक्टोबरला सकाळी काल्याचे कीर्तन ह.भ.प प्रशांत महाराज करतील व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून या वरील कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन प्रकाश म्याकलवार व समस्त जामनी ग्रामवासियानी केले आहे.