Lodha Hospital

आश्रमशशाळा ते युनिवर्सिटी लेव्हल प्लेअर सुप्रियाचा प्रवास

उत्सव भक्तीचा, गौरव श्क्तीचा, नऊ जणी-बहुगुणी अंतर्गत खास लेख

0

घनश्याम आवारी, वणी: झरी तालुक्यातील मार्की हे छोटंसं खेडं. तिथल्या आश्रमशाळेतून सुप्रियाचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. विविध क्रीडाप्रकारात एक्स्पर्ट होत सुप्रिया युनिव्हर्सिटी लेव्हलची प्लेअर झाली. आज ती एका मोठ्या विद्यार्थी संघटनेसाठी कार्यरत आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या ‘शक्ती’ला सलाम. या बहुगुणी वणीच्या लेकीचं नाव आहे, सुप्रिया सोनटक्के. तिचाच हा चित्तथरारक जीवनप्रवास.

सुप्रियाचं प्राथमिक शिक्षण झरी तालुक्यातील मार्कीच्या आश्रमशाळेत झालं. लहानपणापासूनच खो-खो, कबड्डी. हॉलीबॉल या सर्व खेळांमध्ये तिला रुची होती.
सोबतच लहानपणापासूनच डान्सचीसुद्धा आवड होती. पुढील शिक्षणासाठी वणी येथील जनता शाळामध्ये ऍडमिशन केली. सोबतच डान्स क्लासेस लावले. डान्सचं टेक्निकल शिक्षण घेण्याचं तिने ठरवलं. त्यासाठी तिने भरतनाट्यमचे धडे घेण्यास सुरुवात केली. किंबहुना तिला त्यात डिप्लोमासुद्धा मिळाला.

Sagar Katpis

पुढे सुप्रियाने अग्रिकल्चर शिक्षण घेतलं. दरम्यान ती बॅडमिंटनमध्ये एक्स्पर्ट झाली. ती बॅडमिंटनमची युनिव्हर्सिटी प्लेयरसुद्धा होती. बारावीपर्यंतच शिक्षण तिने वणीलाच यशस्वीरीत्या पूर्ण केलं. ॲग्रीकल्चरचा डिप्लोमादेखील झाला. डिग्रीसाठी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरसाठी सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रवेश घेतला.

लहानपणापासून मला डान्सची आवड होतीच. ती सुप्रियाने निष्ठेने आणि परिश्रमाने जपली. तिने आपल्या नृत्यकौशल्याने अनेकांना अचंबित केले. एवढंच नव्हे तर ‘युथ फेस्टिवल 2018’ डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये पहिला क्रमांक मिळवला. सोबतच एकल अभिनयातही पहिला क्रमांक मिळवला.

सुप्रिया ही कॉलेजलाईफमध्ये एन.सी.सी. कॅडेट होती. आधीपासूनच सैनिकांबद्दल एक आदर, आपुलकी आणि सॉफ्ट कॉर्नर होता. आपणही असंच आपल्या देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा मनात होती. कॉलेजमध्ये असताना ती विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. तसेच एकदा विद्यार्थी परिषदेमार्फत ‘महा अग्रो विजन’ घेण्यात आलं. त्यामध्येसुद्धा तिचा सक्रिय सहभाग होता.

एक विद्यार्थीनी म्हणून तिला अनेक समस्या भेडसावत होत्या. इतर विद्यार्थ्यांच्या समस्याही ती पाहत होती. याविरूद्ध आवाज उठवावा असं तिला वारंवार वाटायचं. तिने समस्यांना वाचा फोडल्या. काही दिवसांमध्ये त्या समस्यांचे सोल्युशन मिळालं. ती पहिल्यांदा जिंकली. तिला यश मिळालं.

तेव्हाच तिला वाटलं, की जे संघटन विद्यार्थ्यांच्या हितासाठी खंबीरपणे उभे असते, लढते कार्यक्रमास नाहीतर रचनात्मक कार्यक्रम घेते त्या कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि सर्वांगीण विकास होऊ शकतो, अशा संघटनेचा आपण एक अंग बनलं पाहिजे असं तिला वाटलं. अशाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ती जायला लागली. आता तर ती सक्रिय सदस्य झाली आहे.

विद्यार्थी परिषदेच्या माध्यामातून सुप्रियाच्या कार्याला गती मिळाली. विद्यार्थीदशेत येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या येतात त्याचे निवारण करणे तिने सुरू केले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती, देशाप्रती एक भावना निर्माण करणे हे त्यासाठी आंदोलने, कार्यक्रम या सर्व गोष्टी तिने सुरू केल्यात.

दहावीपासून पीएचडी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अंजली कार्यरत असते. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्सनालिटी डेव्हलपमेंट कॅम्प ती घेते. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम घेते. एग्रीकल्चरचा विद्यार्थ्यांसाठी ऍग्रो व्हिजन, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी डिपेक्स आणि फार्मसीच्या स्टुडेंटसाठी फार्म विजनसारखे विविध उपक्रम ती राबविते.

SFD अर्थात student for development ह्या अभिनव उपक्रमावर ती काम करते. जल, जंगल, जीवन, जानवर, जमीन या 5 तत्वांवर ती काम करते. SFS म्हणून student for seva हाही उपक्रम तेवढाच नावीन्यपूर्ण आहे. ‘चलो जलाऐ दीप वहा, जहा अभी भी अंधेरा है!’ या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदना निर्माण व्हावी म्हणून हे आयाम चालतात. महिलासुरक्षेसाठी ‘मिशन साहसी’ नावाचे आत्म सरंक्षण शिबिर प्रत्येक कॉलेजमध्ये, शाळांमध्ये जाऊन घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.

वर्तमानात लॉकडॉऊनच्या काळातही ती वेगवेगळ्या प्रकारचे सेवाकार्य चालवते. अन्नधान्य वाटणे असो, झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटरी नॅपकीनचे वाटप असो यात ती अग्रेसर असते. मास्क तयार करून ते वाटपाचे कार्यही सुप्रिया करते. सगळे लॉकडॉऊनच्या काळात घरी बसले आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संपर्क साधून यांच्या परीक्षा संबंधातल्या सर्व प्रश्नांचे निवारण करण्याचं कार्यही सुप्रिया करते. शैक्षणिक समस्यांचे निवारण करणे अशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे कार्य सुप्रिया करते.

आज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. फीज असो, परीक्षा असो, स्कॉलरशिप असो या सगळ्या समस्यांवर काहीतरी तोडगा काढण्याचा सुप्रियाच प्रयत्न असतो. यातून सुप्रियाला जो आनंद मिळतो, समाधान मिळते ते सर्वात मोठ आहे असे ती मानते. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात आणि वेगवेगळी कौशल्ये असतात. त्याला जेव्हा योग्य दिशा मिळेल तेव्हाच ते चांगल्या स्वरूपात बाहेर पडतील असा तिला विश्वास आहे.

आपण बघतो जेव्हा लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो तेव्हा त्याचं सोनं होतं. तसेच सुप्रियाच्या आयुष्यात अनेक चांगली माणसं आलीत. ती आपल्या वक्तृत्वशैलीचं श्रेय विद्यार्थी परिषदेला देते. आता तिची वैचारिक बैठकही मजबूत झाली असल्याचं ती मानते. नवरात्रीच्या या पर्वावर सर्व मुलींनी आणि महिलांनी साहसी आणि प्रज्ञावंत व्हावं असं सुप्रिया म्हणते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!