व्यक्तिमत्व विकासासाठी युवकांना निःशुल्क प्रशिक्षण
नूरजहॉं बेगम सलाम अहमद कॉलेजमधे नवा कोर्स
बहुगुणी डेस्क, वणीः हे युग स्पर्धेचं आहे. यात टिकायचं असेल तर आपल्याला अनेक कौशल्य हस्तगत करावी लागतील. शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमात आतापर्यंत न आलेले अनेक विषय आपल्याला वणीत शिकता येणार आहे. जे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, मुलाखतींसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी पडतील. वडगाव रोड विठ्ठलवाडी येथील नूरजहॉं बेगम सलाम अहमद कॉलेजमधे असा अभ्यासक्रम निःशुल्क शिकवला जाणार आहे.
इंग्रजी संभाषण, कंप्युटर अॅण्ड इंटरनेट, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, जीवन कौशल्य, इंटरव्ह्यू कौशल्य या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्षन होईल. शिक्षण शून्य ते दहावी असल्यास 18 ते 30 वयोगटातील कुणालाही यात प्रवेश घेता येईल. नगर परिषद शाळा क्रमांक 7, अहमद लेआऊट, वडगाव रोड, विठ्ठलवाडी येथे नूरजहॉं बेगम सलाम अहमद कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अधिक माहितीकरिता प्राचार्य अरूण अंभोरे 7499493589, क्रिस्टिना 8407927779, रोहिणी 7020025160 यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.