नांदेपेरा सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

0

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी संजय देरकर यांच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरूवात झाली. ही सुरूवात नांदेपेरा सर्कलपासून करण्यात आली. वनोजा देवी येथे जनसंपर्क दौऱ्यानिमित्त दुपारी 12 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यात नांदेपेरा सर्कलमधले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत संजय देरकर यांनी सर्कलचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच बुथबांधणी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना संजय देरकर म्हणाले की आता निवड निवडणुकीला केवळ काही दिवस शिल्लक आहेत. कार्यकर्त्यांनी आतापासून बुथ बांधणीच्या कामाला लागायला हवे. बुथ प्रमुखांनी बुथ कमिटी तयार करावी तसेच लोकांशी संपर्क साधून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय झाला असल्याने कार्यकर्त्यांनी लगेच कामाला लागा असा आदेश संजय देरकर यांनी दिला.

या बैठकीत नांदेपेरा सर्कलमधल्या कार्यकर्त्यांनीही आपल्या गावातील समस्या मांडून त्यावर चर्चा केली. जनसंपर्क दौऱ्यातला पुढचा टप्पा पाटण सर्कल असून उद्या रविवारी दिनांक 28 जुलै रोजी मुकुटबन येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.