राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाने हादरले यवतमाळ
वणीतूूून 300 पेक्षा अधिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सहभाग
यवतमाळ: शेतकरी, व्यावसायिक, कर्मचारी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवारी दिनांक 25 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील तिरंगा चौकात दुपारी 1 वाजता धरणे धरण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात सुमारे 300 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात यवतमाळ येथे मंजूर झालेले कृषी महाविद्यालय चंद्रपूर जिल्ह्यात हलवण्यात आले आहे. हे महाविद्यालय यवतमाळ जिल्ह्यात परत आणावे. बोगस कीटकनाशके व बिबियाणे विकणा-यांवर कठोर कार्यवाही करावी. घरगुती व शेतीसाठी केलेली भरमसाठ वीजदरवाढ कमी करावी. शेतीला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा. पेट्रोल व डीजेलचे आकाशाला भिडलेले दर कमी करावे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आटोक्यात आणाव्या. इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जर या मागण्या मान्य केल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
डॉ. महेंद्र लोढा यांनी गाजवली सभा
या आंदोलनात सर्वात मोठा सहभाग होता तो वणी विधानसभा क्षेत्राचा. वणीतून 30 गाड्यासह सुमारे 300 कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सभेत बोलताना लोढा यांनी सरकारवर खरपूस टीका करत सरकारच्या धोरणांची चांगलीच पिसं काढली. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय चंद्रपूर जिल्ह्यात हलवल्या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत हे महाविद्यालय जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. जर असे पावलं उचलले गेल्यास गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी दिला. राकॉंचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या खांद्याला खांदा लावून घेतलेला डॉ. लोढा यांचा सहभाग यावेळी लक्ष वेधून घेत होता.
धरणे आंजोलनात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक, ख्वाजा बेग, डॉ. महेंद्र लोढा, संदीप बाजोरीया, नाना गाडबैले, अशोक घारपडकर, सदबा मोहोटे, रियासत अली, मुबारक नवर, आरती फुपाटे, क्रांती राऊत, सुभाष ठोकळ, वर्षा निकम, शिवाजी राठोड, सनिष भोय़र, मनिषा काटे, राहुल कानारकर, निलेश देशमुख, नरेश ठाकूर, नंदू कुळमेथे, महेश गवई, करीम खान, प्रसाद ठाकरे, प्रकाश कुळसंगे, रवी नालमवार, उत्तमराव गुल्हाणे, आमिन भाटी, चिराग शाहा यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व़ै कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते.
लिंकवर पाहा भाषणाचा व्हिडीओ…