शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे चॉकलेट, चिप्स देऊन स्वागत

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसचा अनोखा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा सोमवार 4 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु झाल्या. कोविडचे सर्व नियम पाळून वणी शहरातील सर्व शाळांची घंट्टा वाजली आहे. शाळा जवळपास दीड वर्षानंतर सुरू झाल्या असल्या तरी मुलांचा उत्साह हा पहिल्यापेक्षा आता जास्त दिसून येत आहे.

शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आनंद व उत्साह बघता महिला राष्ट्रवादी कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार वणी शहर महिला राष्ट्रवादी कोंग्रेसतर्फे मंगळवारी वणी येथील जनता शाळेतील विद्यार्थ्याना चॉकलेट व चिप्स देऊन स्वागत करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी शाळेतील शिक्षकांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेस महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, जिल्हा उपाध्यक्ष विजया आगबत्तलवार, जयसिंग गोहोकार, माजी नगराध्यक्ष आशा टोंगे, वैशाली तायडे, मंगला टोंगे व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.

Comments are closed.