राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात धरणे आंदोलन

वणीतून 300 कार्यकर्ते होणार आंदोलनात सहभागी

0

बहुगुणी डेस्क, वणी: विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यवतमाळ येथील तिरंगा चौकात आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन दुपारी 1 वाजता होणार असून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात होणार आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात सुमारे 300 पदाधिकारी, बुथप्रमुख वणीवरून यवतमाळला होणा-या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.

घरघुती व शेतीसाठी केलेली भरमसाठ वीजदरवाढ, शेतीला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा. पेट्रोल व डिझेलचे आकाशाला भिडलेले दर कमी करावेत. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमती आटोक्यात आणाव्या. यवतमाळ येथे मंजूर झालेले कृषी महाविद्यालय मूल जि. चंद्रपूर येथे पळविले. ते यवतमाळ जिल्ह्यात परत आणावे. बोगस किटकनाशके व बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी. इत्यादी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळी 9 वाजता या वणीतून सुमारे 300 कार्यकर्ते, बुथप्रमुख, पदाधिकारी हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघत आहे. दुपारी 1 वाजता यवतमाळ येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.