गांधीजयंतीला काँग्रेस पक्षाची विविध प्रश्नांवर निदर्शने
काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्षांसह नेते, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा सहभाग
सुशील ओझा, झरी: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर झरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अँड. राजीव कासावार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांना धरून निदर्शने करण्यात आलीत. यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झालेत.
सरकारने बनविलेले नवीन कृषिकायदे रद्द व्हावेत, हाथरस प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. तसेच उत्तर प्रदेशात राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत झरीच्या तहासीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले.
झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भुमारेड्डी बाजनलावार, माजी जि. प. सभापती प्रकाश कासावार, प्रकाश म्याकलवार, नीलेश येल्टिवार, भुमारेड्डी येनपोतुलवार, केशव नाकले, सुनील ढाले , नागोराव उरवते, राहुल दांडेकर, यु.काँ.झरी तालुका अध्यक्ष हरिदास गुर्जलवार, जानक नाकले, मिथुन सोयाम, शेखर बोनगीरवार,
अमोल आवारी, पांडुरंग येनगंधेवार, राकेश गालेवार, शंकर आकुलवार, समीर लेनगुळे, टिपेश्वर मादेवार, दीपक कांबळे, संजय कुरमशेट्टीवार, महेंद्र किलचेटवार, विकास ठाकरे, नितीन खडसे, नंदकिशोर किनाके, राजू शेख, नागेश सोयाम, सुभाष मडावी, श्रीराम शेडमाके, श्रीपाद हरके, अरुण उरकुडे, सोमनाथ पानघाटे, माधव आत्राम, पांडुरंग भुसेवार आदी उपस्थित होते.