बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी पतीसह भासरा, जावू आणि नणंद अशा चार जणांविरोधात बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिला ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती तिच्या भावासह राहायची. तिचे एप्रिल 2025 मध्ये रितीरिवाजानुसार चंद्रपूर जिह्यातील देव्हाळा येथे लग्न झाले. लग्नापूर्वी कोणत्याही प्रकारच्या हुंड्याची अपेक्षा नसल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले होते. मात्र एन्गेजमेंटच्या दिवशीच पतीकडून नवरीला दागिने करण्याची मागणी करण्यात आली. मात्र अखेर बैठकीत लग्नाचा अर्धा-अर्धा खर्च करण्याचे ठरले व पीडितेचे लग्न झाले.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, परंतु नंतर पती (38) व सासरच्या मंडळींनी वारंवार पैशाचा विषय काढणे सुरु केले. मुलीच्या नावे असलेली शेती वेकोलित जाणार आहे. त्यामुळे सदर सिट पुतण्याच्या नावे कर याचा तगादा पतीने पत्नीकडे लावला. तर नणंदने लग्नात चार लाखांचा खर्च झाला. हा खर्च कर्ज काढून केला. त्यामुळे भावकडून पैसे आणण्यासाठी त्रास देणे सुरु केले. मात्र पीडितेने भावाकडून पैसे आणण्यास व वेकोलिची सीट देण्यास नकार दिला.
त्यानंतर तिला शिवीगाळ, धमकी आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रकार सुरू झाले. तिची तब्येत बिघडल्यावर तिला योग्य वैद्यकीय उपचार न देता तिला कुठल्यातरी आयुर्वेदिक गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे चुकीच्या गोळ्या देण्याचा संशय तिला होता. तसेच सासरच्या मंडळींनी पीडितेच्या बहिणीला देखील फोन करून अपमानास्पद भाषा वापरून शिवीगाळ केली. तसेच तिचे लग्नाआधी बरेच अफेअर असल्याचे बोलत तिच्या चारित्र्यावर सार्वजनिकरित्या संशय घेऊन तिची बदनामी केली.
मुलाला बँकेत नोकरी असून 50 हजार रुपये पगार आहे. तसेच मुलगा उच्चशिक्षित असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचाही आरोप तिने केला आहे. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने भावासह मारेगाव पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी पतीसह सासरच्या तीन इतर सदस्यांविरोधात बीएनएस कलम 85, 3(5), 351(2), 351(3), 351(4), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Comments are closed.