माजी सरपंच महेश पिदूरकर यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली

ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते, एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याच भावना

0
Jadhao Clinic

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व कोलारपिंपरीचे माजी सरपंच महेश पिदूरकर (48) यांचे आज 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. गेल्या एक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्राप्त माहिती नुसार, महेश पिदूरकर यांची गेल्या महिन्यात प्रकृती बिघडली होती. त्यांना नागपूर येथे लता मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. त्यातून ते बरे ही झाले होते. त्यांना गेल्या आठवड्यात सुटी मिळाली होती. त्यामुळे ते वणीत परत आले होते. मात्र दोन तीन दिवसांनी त्यांची प्रकृती आणखी खालवली. नाक आणि दाढेची त्यांना समस्या उद्भवली. त्यामुळे त्यांना पुन्हा नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आज रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महेश पिदूरकर हे वणीतील भालर रोड परिसरात राहायचे. वेकोलिमध्ये ते नोकरीला होते. राजकारण आणि समाजकारणात त्यांना विशेष रुची होती. कोलापिंपरी या गावाचे काही काळ त्यांनी सरपंचपदही भूषवले होते. तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ते महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून एक सच्चा कार्यकर्ता हपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!