संजय खाडे यांना पितृशोक, रामचंद्र खाडे यांचे निधन
नागपूर येथे उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत, आज संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांचे वडील रामचंद्र खाडे यांचे आज गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू होता. त्यामुळे दोन आठवड्याआधी त्यांना उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता संजय खाडे यांचे राहते घर शेतकरी मंदिर वणी, येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. रामचंद्र खाडे मुळचे तालुक्यातील उकणी येथील रहिवासी होते. शेतीत रमणारे रामचंद्र खाडे यांचा शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील वावर होता. लोककल्याण एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक सचिव होते. या संस्थेद्वारा संचालित उकणी येथे शाळा आहे. ते उकणी ग्रामपंचायतीचे सदस्य राहिले आहे. याशिवाय अनेक सामाजिक, धार्मिक कार्यात ते सहभागी असायचे. अतिशय प्रामाणिक व मनमिळावू अशी त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात संजय खाडे व विजय खाडे ही दोन मुले, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Comments are closed.