आधी होकार, नंतर वेगळाच प्रकार… गर्भवती प्रेयसीला लग्नास नकार

प्रेयसीचा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

भास्कर राऊत, मारेगाव: दोघांची एकमेकांवर नजर पडली. नजरेचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेम बहरू लागले. भेटीगाठी वाढल्या. संबंध दृढ झाले. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ गेले. जे नको व्हायला तेही होत गेले. अशातच तीन वर्षे लोटली. प्रेमरूपी वेलीवर एक फुल उमलायला लागले. मात्र प्रियकराने अचानक हात वर करत लग्नास नकार देत प्रेयसीला गर्भपात करण्यास सांगितले. अखेर प्रेयसीने प्रियकराविरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. सदर घटना तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान हा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीने कीटकनाशक प्राशन केले.

अमोल राजेंद्र नक्षिणे असे आरोपी प्रियकाराचे नाव असून तो तालुक्यातील नरसाळा येथील रहिवासी आहे. तो 27 वर्षांचा आहे. याचे तालुक्यातील एका 24 वर्षीय तरुणीशी ओळख होती. पुढे त्यांचे सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. दोघेही अधूनमधून लपून भेटायचे. अशातच दोघांना एकमेकांविषयी ओढ निर्माण झाली. संबंध वाढत गेले. प्रेमाच्याही पलीकडे जात दोघेही एकमेकांमध्ये आकंठ बुडाले.

दरम्यानच्या काळात प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत युवतीचे लैंगिक शोषण केले. अशातच या युवतीला गर्भधारणा झाली. युवतीने लग्नाचा तगादा लावताच आपण लग्न नंतर करू, गर्भपात करून टाक असे सांगून लग्नास नकार दिला. व गर्भपाताच्या गोळ्याही आणून देत जबरदस्तीने घ्यायला लावल्या.

प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न
आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच युवतीने विषारी कीटकनाशक घेत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात पीडितीने टपालाद्वारे मारेगाव पो. स्टे. ला तक्रार दाखल केली. मारेगाव पोलीसांनी संशयितावर ऍक्ट्रासिटी तसेच कलम 376 नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.

Comments are closed.