अखेर दीड महिन्यानंतर मृत्यूशी झुंज थांबली

महादेव मोटर्सचे संचालक सचिन ठाकरे यांचे निधन

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायीक व महादेव मोटर्सचे संचालक सचिन भोजराजजी ठाकरे (40) यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. सोमवार सायंकाळी 7.30 दरम्यान नागपूर येथे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुस्वभावी असणा-या सचिन ठाकरे यांच्या अचानक मृत्यूने वणी व जिल्ह्यात त्यांच्या मित्र मंडळीला धक्का बसला आहे.

वणी वरोरा मार्गावर महादेव मोटर्स या नावाने होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे मोठे शोरूम आहे. सचिन ठाकरे या शोरूमचे संचालक होते. मूळ यवतमाळचे सचिन ठाकरे हे अगदी कमी वयात यशस्वी उद्योजक म्हणून प्रख्यात झाले. 26 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यवतमाळ येथे काही दिवस उपचारानंतर त्यांना नागपूर येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोरोनाचा उपचार सुरु असताना त्यांना पेरलेसिसचा अटॅक आला होता. त्यानंतर काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) ने त्यांच्या मेंदूवर अटॅक केले. त्यांचे दोन ऑपरेशनही झाले होते. मात्र अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज संपली. सचिन ठाकरे यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, आई, भाऊ व एक विवाहित बहीण आहे. वणी बहुगुणी तर्फे त्यांना श्रद्धांजली.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात एकही रुग्ण नाही, आता अवघे 31 ऍक्टिव्ह रुग्ण

अनलॉक होताच तिस-या लाटेसाठी वणीकरांकडून स्वागत…!

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.